अकोला : अकोल्याचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शर्मा यांना कर्करोगाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज शुक्रवारी (दि. 3) रात्री 8 वाजता त्यांचे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवार (दि. 4) दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती.… pic.twitter.com/ni7yR6OMq6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विट करून त्यांनी म्हंटले की, अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे.
अकोला जिल्ह्यात पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध जबाबदार्या सांभाळत पक्षविस्तारात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्यांमधून त्यांनी जनतेची सेवा केली. विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तर त्यांनी केलाच. पण, या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठे कार्य केले. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अगदी अलीकडे मुंबईत त्यांना उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. राममंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो. ॐ शांती..