कौशांबी – उत्तर प्रदेशच्या विधानसभेची निवडणूक सर्वसाधारण नसून उत्तर प्रदेशातील लोकशाही वाचवण्यासाठीची आणि भविष्य बदलण्याची आहे, असे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा मुद्दावरून राजकीय वर्तुळात राजकारण चांगलंच तापल आहे.
मैं कल यहां कौशांबी का ही एक वीडियो देख रहा था।
ये घोर परिवारवादी किस तरह दलितों का अपमान करते हैं, ये उस वीडियो में साफ दिखाई देता है।
– प्रधानमंत्री श्री @narendramodi #मेरा_वोट_बीजेपी_को#BJPwinningUP pic.twitter.com/cYu3jMoTuI
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) February 23, 2022
सोशलवर व्हायरल व्हिडियोमध्ये अखिलेश यादव यांना कौशांबी येथील प्रचारसभेत मंचावर सर्वात प्रथम भगवान गौतम बुद्ध यांची एक मुर्ती भेट देण्यात आली. मात्र यावेळी यादव यांनी मुर्तीला हात न लावताच ती बाजूला ठेवण्यास सांगितलं. यानंतर त्यांना चांदीचा मुकूट दिला असता तो त्यांनी घातला.’ हा व्हिडियो सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडियोला अनेक भाजप नेत्यासह उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य ट्विट करत अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यादव यांच्यावर टीका केली.
मात्र सोशलवर व्हायरल व्हिडियोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सात सेकंदाचा व्हिडीओ टाकत लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आऱोप केला आहे. यावरून समाजवादी पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे.