ajit pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती येथील गोविंद बागेतील आपल्या निवासस्थानी दिवाळी पाडव्यासाठी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सामान्य नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी, शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तर दिली. पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडव्यात अजित पवार यांची अनुपस्थिती यंदा चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी याबाबतही भाष्य केले.
यावेळी, निधीवाटपावरून अजित पवार गट नाराज असून अमित शहा यांच्यासोबतच्या झालेल्या भेटीत याबाबत चर्चा झाल्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले.
मात्र, या प्रश्नावर भाष्य करणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारला. यावर शरद पवार यांनी, रोहित पवार बीड येथे कार्यक्रमासाठी असून अन्य सदस्यही आपापल्या अडचणींमुळे अनुपस्थित असल्याचे सांगितले. काही लोक आजारी असल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्या अनुपस्थितीवर भाष्य केले.