Air India on wheelchair। मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाने 80 वर्षांच्या वृद्धाला व्हीलचेअर देण्यास नकार दिला. त्यामुळे ते एक ते दीड किलोमीटर चालत गेल्याने त्यांना हृदयविकाराचा आला. त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, या वृद्धाने पत्नीसह न्यूयॉर्कहून मुंबईला एअर इंडियाचे विमान घेतले होते. ते सुखरूप मुंबईत पोहोचले पण विमानतळावर त्यांना एकच व्हीलचेअर मिळाली. त्यावर त्यांनी पत्नीला बसवले.नंतर त्यांनी एअर इंडियाकडून दुसरी व्हीलचेअर मागितली पण एअर इंडियाने चेअर देण्यास नकार दिला.
तिकीट खरेदी करताना त्याने व्हीलचेअर बुक केली होती हे कारण कंपनीकडून देण्यात आले. व्हीलचेअर नसल्यामुळे ते पत्नीसह पायीच निघाले. त्यानंतर वृद्धाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.
व्हीलचेअर आधीच बुक केली होती Air India on wheelchair।
प्राप्त माहितीनुसार, या जोडप्याने व्हीलचेअरची आगाऊ बुकिंग केली होती, परंतु केवळ त्यांच्या पत्नीला व्हीलचेअर मिळाली. ते पत्नीसह पायी चालत होते. काउंटरवर पोहोचताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण Air India on wheelchair।
या घटनेनंतर एअर इंडियाने, “दुर्दैवाने, न्यूयॉर्क ते मुंबई असा प्रवास करणारा आमचे प्रवासी त्याच्या पत्नीला व्हीलचेअरवर घेऊन जात होते. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्यांना व्हीलचेअरवर थांबायला सांगितले. मात्र, त्यांनी पत्नीला व्हीलचेअरवर बसवले आणि त्यांच्यासोबत चालायला सुरुवात केली. विमानतळावरील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.