मॉस्को – आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आधुनिक काळात विविध कारणांसाठी वापरले जात आहे तसेच ते गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.
पण या प्रणालीने जर चूक केली तर काय होऊ शकते याचा अनुभव सध्या रशियातील एक शास्त्रज्ञ घेत आहे या शास्त्रज्ञाचा चेहरा एका फरारी खुनी गुन्हेगाराच्या चेहऱ्याची साधर्म दाखवणारा असल्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सने याच शास्त्रज्ञाला फरारी खुनी मानले त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून गेले दहा महिने तो विनाकारणच कारावासात शिक्षा भोगत आहे अलेक्झांडर सेतकोव असे या शास्त्रज्ञाचे नाव असून तो रशियन अकॅडमी ऑफ सायन्समध्ये जीवशास्त्राबाबत संशोधन करत असतो.
दहा महिन्यापूर्वी एकदा विमान प्रवास करत असताना त्याचा हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानतळावरच पोलिसांनी त्याला उचलले आणि त्याला फरारी खुनी समजून कारावासात टाकले वीस वर्षांपूर्वी राजधानी मास्को आणि परिसरामध्ये दोन खुनाच्या मालिकेला जबाबदार असणाऱ्या एका गुन्हेगाराच्या चेहऱ्याप्रमाणेच या शास्त्रज्ञाचा चेहरा असल्याने त्याचा फटका त्याला बसला जेव्हा हे खून घडले होते तेव्हा हा शास्त्रज्ञ आपल्या संस्थेतच कार्यरत होता अशा प्रकारचे जबाब त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी देऊन सुद्धा पोलिसांनी ते मान्य केले नाहीत आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने खुन्याचा जो चेहरा तयार केला होता त्याला 50% पेक्षा साधर्म्य या शास्त्रज्ञाच्या चेहऱ्यात आढळल्याने तोच हा खुनी आहे हे पोलिसांनी ठरवले आणि सध्या हा शास्त्रज्ञ केव्हा या तंत्रज्ञानाचा फटका बसल्याने शिक्षा भोगत आहे.