निघोज – येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव शिवराम लंके यांच्या कुटुंबाकडून टाकळी खातगाव येथील श्रीराम दिंडी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो भाविक व ग्रामस्थांनी विशाल लंके, वैभव लंके, दुर्गाबाई लंके, छायाताई लंके, हर्षदा लंके, विनया ढवळे यांनी तयार केलेल्या रुचकर महाप्रसादाचा लाभ घेतला. पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंदा उनवणे, स्वरांजली उनवणे, रेवा उनवणे यांनी दिंडीतील भाविकांसाठी चहापाण्याची व्यवस्था केली होती.
यावेळी भजन गात हरिनामाचा गजर करीत श्रीराम दिंडी सोहळ्यातील महिला भगिनींनी भक्तीमय संस्कृतीचा प्रभाव दाखवला. रेवा रोहन उनवणे या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने उपस्थित भाविकांपुढे गणपतीचे गाणे गात तसेच इंग्रजी भाषण करीत उपस्थितांचे मनोरंजन केले.