पारनेर – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२३ मध्ये श्री समर्थ पॉलीटेकनिकचा पाचव्या सत्राचा ८६ टक्के निकाल लागला. डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातून द्वितीय वर्षातील सिद्धी दरवडे या विद्यार्थिनीने ८६.६७ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य देसले यांनी दिली.
संस्थेच्या वेगवेगळ्या विभागातून विद्यार्थ्यांनी घवघावित यश संपादन केले आहे. डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजीनियरिंग विभागातून प्रथम वर्षातील पूजा कोहकडे ८१.०६% गुण मिळवून प्रथम आली. द्वितीय वर्षातील सिद्धी दरवडे या विद्यार्थिनीने ८६.६७ टक्के गुण मिळून प्रथम आली. तृतीय वर्षातून वैष्णवी साबळे ८४.३३% मिळून प्रथम आली. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून प्रथम वर्षातील आठरे बाळू ६९.८८टक्के गुण मिळवून प्रथम ,द्वितीय वर्षातील काळे ओम ७३.७९ टक्के गुण मिळवून प्रथम , व्दितीय वर्षांतील काळे ओम ७३.७९ टक्के गुण मिळवून प्रथम, व तृतीय वर्षातून दर्शन साठे हा विद्यार्थी ७७.७१ टक्के गुण मिळवून प्रथम आला.
तृतीय वर्षातून वैष्णवी साबळे हा विद्यार्थी ८४.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आला. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रथम वर्षातून झोडगे शिल्पा ७५टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय वर्षातून गायकवाड आकाश ८० टक्के प्रथम व तृतीय वर्षातील गाडीलकर शुभम ८३.७० टक्के मिळून प्रथम आला आहे डिप्लोमा इन इ एन टी सी इंजिनिअरिंग विभागातून प्रथम वर्षातील तनुजा वैद्य ७९.६५ टक्के म्हणून प्रथम द्वितीय वर्षातील ऋतुजा गाडीलकर ७९.०६ टक्के प्रथम, तृतीय वर्षातील धनश्री खामकर ६४.२१ टक्के गुण मिळून प्रथम आली आहे.संस्थेचे संचालक कैलास गाडीलकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.