पारनेर – तालुक्यातील सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे व त्यांचे पती उद्योजक योगेश रोकडे यांनी सुपा जिल्हा परिषद शाळेतील एका गरीब होतकरु धावपटूला स्पोर्ट साहित्य देत त्याच्या गतीला बळ दिले असून पुढील शैक्षणिक खर्च उचलणार आहे.
राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या किशन प्रजापती या विद्यार्थ्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मॅरेथॉनमध्ये तो बुटांशिवाय धावला व जिंकलाही. ही वार्ता जेव्हा सरपंच रोकडे दामपत्याला समजली, तेव्हा उद्योजक योगेश रोकडे यांनी त्या कुटुंबाची परिस्थिती समजून घेतली.
रोकडे दाम्पत्याने त्याला प्रोत्साहन देण्याकरीता मदतीचा हातदेत स्पोर्टस साहित्य देत त्याच्या पंखांना व स्वप्नांना बळ दिले. यापुढेही त्याला खेळाकरीता जे जे सहकार्य लागेल ते करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यामुळे किशनसारख्या मुलांना परिस्थितीवर मात करत नक्कीच पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.