शिर्डी – अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त साईसंस्थान, नगरपरिषद तसेच शिर्डी ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या वतीने शिर्डी येथील साईनगर मैदानावर दररोज सायंकाळी भव्य श्रीराम कथा सोहळ्यास सुरुवात झाली आहे.
मंचर येथील रामायणाचार्य शंकर महाराज शेवाळे रामकथा सांगणार आहेत. २४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजता काल्याचे कीर्तन आणि दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. शिर्डी ग्रामस्थांचे वतीने शिर्डी शहरात भगव्या पताका, रांगोळ्या, सडासमार्जन, विद्युत रोषणाई, आकाश दिवे, पणत्या लावून श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने साईनगरीत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभय शेळके पाटील, कार्याध्यक्षपदी शिवाजी गोंदकर, उपाध्यक्षपदी निलेश कोते व विजयराव जगताप, मार्गदर्शक म्हणुन कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, कमलाकर कोते यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कार्यवाहकपदी रमेश गोंदकर, खजिनदारपदी संदीप पारख तर समन्वयक म्हणून सचिन तांबे, सुजित गोंदकर, सचिन शिंदे, गजानन शेर्वेकर, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे यांची निवड करण्यात आली आहे. रवींद्र गोंदकर, युवा शिर्डी ग्रामस्थ, छत्रपती शासन तसेच शहरातील सर्व युवक या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.