पारनेर – राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून गावगुंडांनी गावातली दोन अनुसूचित जातीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या घराची तोडफोड करून घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासधूस केली. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पारनेर पोलीस प्रशासनास विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आले.
अशा झुंडशाही विरोधात शासनाने ताबडतोब ठोस पावले उचलून संबधितांवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही लोकशाही व संविधानप्रेमी सर्व संघटना व समविचारी पक्ष एकत्र येऊन सरकार विरोधात तीव्र जन आंदोलन सुरू करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर हम भारत के लोगचे राजेंद्र करंदीकर, वंचित बहुजन आघाडी संघटक बाळासाहेब पातारे, छत्रपती क्रांती सेना संघटक अविनाश देशमुख, आरपीआय (आंबेडकर गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, मूलनिवासी संघटनेचे शरद नगरे, जमात ए इस्लाम रफिक राजे, संविधान जागृती संघटक मनोज सूर्यवंशी, युवाध्यक्ष प्रदीप मोरे, ॲड.बाळासाहेब सोनवणे, अशोक जाधव, अजय साळवे, आदित्य वाघमारे, सागर भिंगारदिवे, दादाभाऊ पटेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.