नगर -जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी नेवासा येथील रामेश्वर चोपडे यांची तर उपाध्यक्षपदी निर्गुणा रघुनाथ बांगर-कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली बॅंकेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी चोपडे यांच्या नावाची सुचना सूर्यकांत काळे तर अनुमोदन रमेश गोरे यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी बांगर-कापसे यांच्या नावाची सुचना सरस्वती घुले तर अनुमोदन कारभारी बाबर यांनी दिले. त्यानंतर ही निवड बिनविरोध करण्यात आली.
या निवडीबद्दल शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोपडे म्हणाले की, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाने संधी दिली. त्याला तडा न जाऊ देता शिक्षक बॅंक हे बॅंकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य मानली जाते व बॅंकेच्या सभासदांसाठी विविध योजना आणून पोहोचवणार व बॅंकेची उंची वाढवण्यास कटिबद्ध राहून येणाऱ्या काळात नेटबॅंकिंग व बॅंकेच्या पोस्ट ला दिलेली जागा या संदर्भात प्रयत्न चालू असून शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या स्वप्नातील बॅंक बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली.