संगमनेर – तालुक्याच्या पठार भागातील डोळासणे येथील काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मूर्ती प्राणप्रतिष्ठा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. ५) होणार सून, त्या निमित्त महासत्संग व शेतकरी मेळावा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काळभैरवनाथ देवस्थानची जुनी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी मूर्ती बदलण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी राजस्थानच्या कोटा येथून काळभैरवनाथ व जोगेश्वरीची नवीन मूर्ती आणली आहे.
या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दिंडोरीप्रेणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महासत्संग व शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे, तसेच महामस्तकाभिषेक हवनयुक्त भैरवी चंडी याग या धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी या महासत्संग आणि शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.