डाॅ. वर्षा मोरे पाटील, मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण
जामखेड – रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेमार्फत नेहमी नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम राबवून दिशादर्शक उपक्रम राबविण्यात येतात. प्रत्येकाने समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत, असा आशावाद संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी व्यक्त केला.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर, रत्नापया संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित भास्कर मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर शुभारंभ, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नदीप शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी दोन आत्याधुनिक अतिरिक्त कॉलेज बस देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील, सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील, ग्रामीण रुग्णालय जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज शिंदे, तालुका कृषी मंडल अधिकारी हिरडे आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएएमएस, बीएचएमएस, फार्मसी नर्सिंग कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी रत्नदीप शैक्षणिक संकुलात औषधी वनस्पतीचें रोपन करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील, सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील, कुंदन झा, प्रा. महादेव मोरे,.नामदेवर राळेभात, नव नियुक्त पोलीस उपनिरीक्षक गायत्री राळेभात, भूषण राळेभात,रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सरफराज खान, प्राचार्या प्रज्ञा पुजारी, डॉ. झेबिया शेख आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. यावेळी राळेभात यांची पीएसआयपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व कुटुंबीयांचा संस्थेच्या वतीनेसन्मान करण्यात आला.