कर्जत : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील वाकणवाडी (खांडवी) येथे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणपतिष्ठा करण्यात आली. अयोध्या येथे प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा काल करण्यात आली. याच मुहूर्तावर काकासाहेब तापकीर यांच्या संकल्पनेतून नवीन मंदिर उभारणी करून प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी मूर्तीची टाळ- मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प.बलभीम महाराज पठारे यांचे कीर्तन पार पडले. त्यानंतर महाप्रसादाचा सर्व उपस्थित राम भक्तांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेश काळे, हभप.सोमनाथ महाराज गांगर्डे, हभप दत्तात्रय महाराज खोटे, ग्रामपंचायत सदस्य महादेव तापकीर, प्रगतशील बागायतदार धनराज तापकीर,आण्णासाहेब महारणवर, बापूसाहेब साळवे उपस्थित होते. सर्व उपस्थित भक्तांचे प्रविण तापकीर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी चेअरमन सुरेश पठारे, भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस प्रकाश पठारे, उपसरपंच भाऊसाहेब पठारे, वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे संचालक कुशाबा वायसे, संतोष महाराज वायसे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब उल्हारे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी पठारे, सचिव विशाल भालशिंग, राजेंद्र तापकीर, शहाजी तापकीर, युवराज वायसे, किशोर वायसे, वैभव तापकीर, बाबासाहेब पठारे,सतिष भालशिंग, केशव पठारे, महेश वायसे, पंडित वायसे, विठ्ठल तापकीर,अमोल तापकीर आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.