सातारा – सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भाटमरळी येथील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विकास सेवा सोसायटीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या अजिंक्य ग्रामविकास पॅनलने विरोधी पॅनलचा १२-० असा धुव्वा उडवत पुन्हा एकदा अजिंक्य परंपरा कायम राखली.
अत्यंत अटीतटीने झालेल्या या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पॅनलने सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ता अबाधित राखली. सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक ज्योतीराम चव्हाण, अरुण जाधव, राजेंद्र जाधव, संदेश जाधव, संतोष जाधव, रामचंद्र जंगम, विठ्ठल देशमुख, अनिकेत पवार, अर्चना जाधव, सुनिता जाधव, रवींद्र जाधव, अशोक बल्लाळ यांचा आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सत्कार केला.
यावेळी पॅनलप्रमुख हिंदराज जाधव, सुभाष पवार, सयाजी चव्हाण, संभाजी जाधव, विनायक जाधव, नारायण क्षीरसागर, केशव चव्हाण, नितीन चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, दिनकर पवार, सुरेश पवार, आबासाहेब देशमुख, बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, महेश जाधव, प्रशांत चव्हाण, संतोष देशमुख, डॉ. प्रताप जाधव, अशोक जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेतकरी सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.