रांजणगाव पोलिसयांची कामगिरी : सोनेसांगवी ग्रामस्थांकडून सन्मान
रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिम ट्रिआँन प्रा. लि. या कंपनीमधील कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल थिटे हे कंपनीतून घरी जात असताना त्यांच्यावर काही जणांनी हल्ला करुन त्यांच्यावरती तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. या बाबत माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाई केली. सोनेसांगवी ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अतुल थिटे हे दुपार पाळीचे कामकाज संपवून घरी जात असताना रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये दबा धरून बसलेल्या मुलांनी अतुल थिटे यांच्यावर हल्ला करून तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात थिटे जखमी होऊन झाले होते. अशाही स्थितीत अतुल थिटे यांनी पोलिसांना सपर्क करून माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.
माञ तांतिका बाबींचा अभ्यास करुन पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत कायदेशीर कार्यवाही केली. सहा जणांनी मिळून हा कट रचला केला होता. यातील तीन आरोपी फरार असून शिवाजी प्रल्हाद आवाढ व आणखी दोन जणांवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यामुळे सोनेसांगवी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या सहका-यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मल्हारी काळे, शेतकरी संघटनेचे नेते सुहास काटे, माजी सरपंच संभाजी डांगे, वाघाळे गावचे माजी उपसरपंच राजेंद्र भोसले, नानासाहेब टाकळकर, बाबासाहेब थिटे, अतुल थिटे, यांसह ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.