Entertainment – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणेने (Sharyu Sonawane) अचानकपणे या मालिकेचा निरोप घेतला. शरयूच्या जागी सध्या अभिनेत्री आरती मोरे पिंकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता शरयू सोनावणेने प्रेक्षकांना आणखी एक धक्का दिला आहे. शरयू सोनावणे हिनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत शरयू सोनावणे चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
मंगळवारी गणेश चतुर्थीनिमित्त तिने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. इनस्टाग्रामवर शरयू सोनावणेने साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत लिहीले की, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.” शरयू सोनावणेच्या साखरपुड्याची पोस्ट पाहून कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावर केला आहे. समृद्धी केळकर, गिरीजा प्रभू, विजय आंदळकर, कोमल कुंभार अशा सर्व कलाकार मंडळींनी तिला अभिनंदन केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव जयंत लाडे (Jayant Lade) असे आहे. तो एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे. ‘सूर सपाटा’ आणि ‘अ पेईंग गेस्ट’ या चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे. तर शरयूने ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.