अभिनेत्री मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान पॅनिक अटॅक

अभिनेत्री मुनमुन दत्ताला नव्या गोष्टींचा शोध घेत भटकंती करणे आवडते हे तिच्या सोशल मीडियाच्या फोटोवरून लक्षात येते. त्याविषयीचे ती आपले अनुभव नेहमीच प्रेक्षकांशी शेअर करतच असते. नुकतीच ती पूर्व आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. टांझानियातील या ट्रेकसाठी मुनमुन अनेक दिवसांपासून तयारी करत होती. मात्र ट्रेकवर असताना तिला पॅनिक अटॅक आला आणि तिला अर्ध्या मार्गावरून परत यावे लागले.

मुनमुन माउंट किलिमंजारो येथे ट्रेक करण्यासाठी गेली होती. ट्रेकला जाण्याआधी मुनमुनने दुसऱ्या दिवसाचा अनुभव शेअर केला होता. मात्र मुनमुनला दोन दिवसानंतर ट्रेकच्या मध्येच पॅनिक अटॅक आला, त्यामुळे तिला तातडीने खाली आणावे लागले. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ही ती रात्र होती जेव्हा मला काळोखामुळे क्‍लस्ट्रोफोबिक आणि पॅनिक अटॅकमुळे शिखरावरून खाली आणण्यात आले. यानंतर तिने दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले की, दुःखत अंतकरणाने मला सांगावं लागत आहे की, मला दिवसात दोन वेळा गंभीर क्‍लॉस्ट्रोबियामुळे माउंट किलिमंजारो ट्रेक अर्ध्यावर सोडावा लागला. मी आमच्या टीममधली शारीरिक आणि मानसिक पातळीवर सर्वात मजबूत व्यक्ती होती. मला माहीत होतं की वेळेच्या आधीच मी ते शिखर सर केलं असतं. पण प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात असतेच असं नाही. माझ्याबाबतीत क्‍लॉस्ट्रोफोबियाचा विचार मी ट्रेकच्याआधी केला नव्हता. पण त्या शिखराने मला तो विचार करायला लावला.

मुनमुनने पोस्टमध्ये लिहिलं की, तो गर्द काळोख मला घाबरत होता. मी इतकी घाबरली होती की माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी माझ्या कॅम्पच्या बाहेर जवळपास बेशुद्धच पडली होती. याच कारणामुळे मी ट्रेक तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. मी सुर्यास्तानंतर होणाऱ्या अंधाराला प्रत्येक दिवशी घाबरत होते. मुनमुनने 12 हजार फुटांचा ट्रेक पूर्ण केला होता. तिने यावेळी टीमचे तिचे प्राण वाचवण्यासाठी आभार मानले. तसेच हा अनुभव तिला खूप काही शिकवूनही गेला हे नमूद करायला ती विसरली नाही. या प्रसंगानंतर ती स्वतःला एक वेगळी व्यक्ती मानते. एक वाईट अनुभव आला असला तरी मुनमुनला तो ट्रेक पुन्हा कधीतरी नक्कीच पूर्ण करायचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.