मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही होस्ट ‘लीजा हेडन’चं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. लिसा नेहमीचं आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. मात्र, तिचे आताचे फोटोशूट जरा हटकेच आहे.
लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवताना तिचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
‘मी अँड माय गर्ल’ असे कॅप्शन देत आपल्या मुली सोबतचे समुद्र किनाऱ्यावरील फोटो अभिनेत्री लीजा हेडनचा पोस्ट केले आहेत. कायम आपल्या बोल्ड स्टाइलसाठी लीजा हेडन ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्याची मने जिंकताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये लिसा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या हातात आपल्या मुलीला हातात नारळपाणी दिसत आहे. सध्या तिचा हा लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर हार्ट, रेनबो, बेबीच्या इमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. लिसा आणि डिनो लालवाणी याआधी सुद्धा 2 मुलांचे आई वडील आहेत.