ठाणे – अभिनेत्री केतकी चितळेचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. तर रबाळे पोलीस स्टेशन अंतर्गत ऍट्रोसिटीप्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जवाब येणे बाकी आहे. त्यामुळे केतकीचा जेलमधीला मुक्काम वाढला आहे.