नवी दिल्ली – महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अडचणीत आलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या जामीनावर असून त्याला विरोध करणारे पत्र ईडीने न्यायालयात सादर केले आहे. त्यांनी जामीनाला विरोध केला असला तरी तूर्त न्यायालयाने मात्र जॅकलीनचा जामीन कायम ठेवला आहे.
या प्रकरणात जॅकलीनची चौकशी सुरू असताना तिने पुराव्यांमध्ये छेडछाड केली. तसेच देशाबाहेर पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिच्या विरोधात नोटीस जारी करण्यात आली असल्यामुळे तिला तसे करण्यात यश आले नाही.
तपासातही तिने कोणतेच सहकार्य केले नाही. जेव्हा अन्य आरोपींसमोर तिची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने आपली चूक कबुल केली, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. दरम्यान, न्यायालयाने तिचा जामीन सध्या तरी कायम ठेवला असून पुढची सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.