Debina Banerjee : टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Banerjee) मागील काही दिवसांपासून तिच्या दोन चिमुकल्या मुलींमुळे चर्चेत आहे. मुलींच्या जन्मानंतर देबिना मनोरंजन क्षेत्रापासून दुर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. मुलींचे अनेक व्हिडिओ ती शेअर करताना दिसते. सध्या देबिना आणि तिच्या लेकींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात देबिना दोन्ही मुलींसोबत रॅम्प वॉक करताना दिसली.
बॉम्बे फॅशन वीकमध्ये देबिनाने हजेरी लावली होती. यावेळी तिने मुलींसोबत रॅम्प वॉक केला. देबिनाचा पती गुरमीत चौधरीही कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होता. सध्या देबिनाचा रॅम्प वॉकदरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात दिसते की, देबिना आपल्या मुलीचा हात धरून स्टेजवर येते. तिने दुसऱ्या लहान मुलीला उचलले दिसत आहे. रॅम्पवर येताच देबिना पहिले गुरमीतकडे जाते. यावेळी गुरमीत मुलींचा लाड करत असल्याचे दिसते.
View this post on Instagram
यानंतर आणखी काही व्हिडिओत रॅम्प वॉक नंतर देबिनाने आपल्या मुलींसोबत डान्स केला. या व्हायरल व्हिडिओत देबिना आणि तिच्या मुलींवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहे. यावेळी देबिनाने मरून आणि केशरी रंगाचा राफेल ड्रेस परिधान केला होता. एवढेच नाही तर तिच्या दोन्ही मुलींनीही मॅचिंग आउटफिट घातले होते. देबिना आणि तिच्या मुलींचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, देबिना लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर 3 एप्रिल 2022 रोजी आई झाली. पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 7 महिन्यांत ती पुन्हा आई झाली होती. यावरूनही तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र तेव्हा तिने टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते.