मुंबई – ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ‘अनन्या पांडे’चे आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर फक्त 3 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. परंतु आतापासूनच बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गनना केली जात आहे. अभिनेत्री होण्यापूर्वीपासूनच सोशल मीडियावर अनन्याची जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे.
दरम्यान, आता अनन्या पांडेशी संबधित एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही बातमी पोलिसांसन्दर्भातील असून, मुंबई पोलिसांनी तिची गाडीच लॉक केली होती. चित्रिकरणामध्ये आपण कुठे गाडी लावली याचा अनन्याला विसर पडला त्यामुळे ती गाडी लॉक करण्यात आली होती. त्याचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
मुंबईतील एका स्टूडिओमध्ये अनन्याच्या एका चित्रपटाचे शुटींग सुरु होते. तिच्यासह आणखी काही क्रु मेंबर्सच्या गाड्यांनाही पोलिसांनी जॅमर लावले होते. मात्र ही जागा स्टूडिओच्या वस्तु ठेवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या पांडेच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांशी चर्चा करुन हे प्रकरण मिटवले आहे.
नुकतंच अनन्या पांडेचा ‘गहराइयां’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे लवकरच अनन्या साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा बरोबर ‘लायगर’ नावाच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवची महत्वाची भूमिका असणार आहे.