आई झाल्यानंतर बॉलिवूड तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखत आहे. आता आलियाने तिची मुलगी राहाबाबत अनेक खुलासे केले आहेत. तिने हे देखील सांगितले की ती प्रेमाने तिला काय बोलत असते, तिच्या लेकीचे कुठल्या नावाने हाक मारत असती याबाबत सांगितले आहे.
आलिया भट्ट लेक राहाला तीन नावांनी हाक मारते
रविवारी आलिया भट्टने तिच्या चाहत्यांसाठी थोडा वेळ काढला आणि सोशल मीडिया युजर्सशी इन्स्टाग्रामवर दिलखुलास गप्पा केलाय. अशात आलियाने तिच्या चाहत्यांसोबत आस्क मी एनीथिंग सेशन केले, जिथे तिच्या चाहत्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने तिला विचारले की, ती मुलगी प्रेमाने काय म्हणते. यावर उत्तर देताना आलियाने लिहिले की, ती राहाला प्रेमाने राहु, रारा आणि लॉलीपॉप असे संबोधते.
एका सोशल मीडिया यूजरने आलियाच्या चिंतेशी संबंधित प्रश्न विचारला. चाहत्याने लिहिले की, ‘तुझ्या मुलीपासून दूर राहिल्यानंतर तुम्हाला चिंता वाटते की नाही?’ यावर राहाची आई म्हणाली की, माझ्या मुलीला सोडणे माझ्यासाठी कधीच सोपे नव्हते. मला वाटतं थोडा वेळ लागेल. राहा माझ्या अनुपस्थितीत कुटुंबासोबत आहे या विचाराने मला थोडे बर वाटते.’
नुकताच आलियाने तिची मुलगी राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनच्या काही झलकही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केल्या आहे. मात्र आजपर्यंत त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. ‘कॉफी विथ करण’मध्ये याबद्दल बोलताना आलिया म्हणाली होती की, ती लोकांना कधीच तोंड दाखवणार नाही असे नाही पण ती अजूनही खूप लहान आहे.