मुंबई – इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूचा समावेश आहे. तो विलासी जीवन जगतो. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचे गॅरेज आहे. आता या गॅरेजमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे. महेश बाबूने नुकतीच नवीन रेंज रोव्हर एसव्ही खरेदी केली आहे, ज्याची किंमत करोडोमध्ये आहे.
महेश बाबूने त्यांच्या कारच्या यादीत एक नवीन रेंज रोव्हर कार समाविष्ट केली आहे, आणि तिची किंमत 5.4 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. रेंज रोव्हर ही सेलिब्रिटींची आवडती कार आहे, आणि यामध्ये मोहनलाल, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी आणि इतरांचा समावेश आहे. महेश बाबूची कार एका अनोख्या क्लबमध्ये सामील झाली आहे कारण ते सोनेरी रंगात रेंज रोव्हरचे मालक असलेले हैदराबादमधील एकमेव व्यक्ती बनले आहेत. ही सध्या भारतातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे.
दुसरीकडे, महेशच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, महेश बाबू दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत ‘गुंटूर करम’ नावाच्या आगामी चित्रपटात काम करत आहेत. कलाकार, क्रू, क्रिएटिव्ह मतभेद आणि इतर अनेक कारणांमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, पूजा हेगडे आणि एस थमन यांनी महिला लीड आणि संगीतकार म्हणून चित्रपटातून बाहेर पडले आहे.