मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघांवर कौतुकाचा आणि अभिनंदाचा वर्षाव झाला. सध्या ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांना त्यांची जोडी पसंतीस पडली आहे. नुकतेच मुग्धाने प्रथमेशच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली, जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
मुग्धा सध्या पुण्यात एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली आहे. मात्र या प्रवासादरम्यान ती प्रथमेशला खूप मिस करत आहे. मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जेवणाचं ताट शेअर केलं आहे. सोबतच प्रथमेशची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत तिने ‘मिस्ड यू प्रचंड…!’ असे लिहिले आहे. तिने ही पोस्ट प्रथमेशसह बहीण मृदुला वैशंपायन आणि विश्वजीत जोगळेकर या मित्राला टॅग केली आहे.
मुग्धाने शेअर केलेल्या जेवणाच्या ताटामध्ये विविध भाज्या, पोळी, कोशिंबीर, ताक, गुलाबजाम आणि पाणीपुरी आहे. हे स्वादिष्ट जेवणाचं ताट पाहून मुग्धाला प्रथमेशची खूपच आठवण आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत या दोघांनी एकमेकांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला होता. प्रेमाची कबुली देत मुग्धा आणि प्रथमेशने चाहत्यांना सुखद दिला होता.