Actor Govinda – अभिनेता गोविंदा आहुजा यांनी आज गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी भगवा झेंडा हातात देत गोविंदाचे पक्षात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. । Actor Govinda । Lok Sabha Election 2024
पुन्हा राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. 14 वर्षांनंतर पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईचा विकास झाला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे आभारही मानले.
अभिनेता गोविंदा आहुजा यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. । Actor Govinda । Lok Sabha Election 2024
या आधी देखील अभिनेता गोविंदा आहुजा हे काँग्रेस पक्षाकडून खासदार राहिले आहेत. खासदार झाल्यानंतर त्याने 2006 च्या सुमारास सिनेसृष्टीत पुनरागमन केले होते. मात्र, मागील काही वर्षात गोविंदाची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
गोविंदाने आपल्या कसदार अभिनयाने, दमदार नृत्याने आणि कॉमेडीच्या टायमिंगने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. आणि त्यामुळेच आज देखील गोविंदाचे स्टारडम कमी झालेले नाही. दरम्यान, राजकीय मैदानात पुन्हा उतरलेल्या गोविंदाची ऐकून संपत्ती किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गोविंदाचाही आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याशिवाय त्यांचा जुहूमध्ये एक बंगला आणि मड आयलंडमध्ये एक बंगला आहे. याशिवाय, त्याने अनेक रिअल इस्टेट मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते.
गोविंदाचे कार कलेक्शनही खूपच अप्रतिम आहे. त्याच्याकडे फोर्ड एंडेव्हर आणि मित्सुबिशी लान्सरसह इतर अनेक लक्झरी कार आहेत. त्याच्या उत्पन्नाचा स्रोत हा ब्रँड एंडोर्समेंट आहे. यातून चांगली कमाई होते. गोविंदा यातून दरवर्षी 16 कोटी रुपये कमावतो.
गोविंदाचा काही व्यवसाय असून त्यातून तो करोडोंची कमाई करतो, अशीही चर्चा आहे. मात्र, त्याच्या व्यवसायाबाबत माध्यमांमध्ये फारशी माहिती नाही. पण तो अनेक रिॲलिटी शोमध्ये पाहुणा म्हणून दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाची संपत्ती ही 170 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. । Actor Govinda । Lok Sabha Election 2024