पुणे – तडीपारीचा भंग करुन आलेल्या एकास तसेच शांततेचा भंग करणाऱ्या तीघांवर समर्थ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त हददीत पेट्रोलींग करीत असतांना नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदार महेश जाधव व शुभम देसाई यांनी बारणे रोड तडीपार असलेला गुन्हेगार सलमान उर्फ टिपू इम्तियाज शेख ( रा. काळावाडा, मंगळवार पेठ ) यास मंगळवार पेठेतून ताब्यात घेतले.
सदर आरोपीस दोन वर्षासाठी पोलीस आयुक्त परिमंडळ यांचे आदेशाने 30/11/21 पासून तडीपार करण्यात आले आहे. तसेच दि. 18/2/22 रोजी शुक्रवारची नमाज पठण बंदोबस्त दरम्यान हद्दीत तपास पथक गस्त करत असताना ए.डी.कैंप चौक नानापेठ येथे फराहद मेहमुद शेख (19,रा., गणेश पेठ पुणे. ) रेहान मुक्तार शेख (19,रा- ,गणेशपेठ पुणे.,यांची ) वाजीद युनुस सय्यद (36 ,रा.-पर्वतीदर्शन, साईबाबा मंदीराशेजारी पुणे) यांची आप-आपसात भांडण व एकमेकाला हाणामारी करीत असतांना व सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करीत असताना मिळुन आले. त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, शशीकांत गायकवाड, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शुभम देसाई, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे.