वाल्हे-वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे 900 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य अंकुश साळुंखे, पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार, संदेश पवार, बंटी भुजबळ, संतोष गरूड, आकाश भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तालुकस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील 280 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून एम. एस. भुजबळ, एस. एस. अधिकारी, ममता देसाई, एन. बी. जाडकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजक पी.बी. जगताप, आम्रपाली गडवे, विशांत ठाकूर, स्मिता बाबर, एस. ए. इनामदार, पी. एल. जगताप आदींनी स्पर्धेचे संयोजन केले. प्राचार्य अंकुश साळुंखे यांनी आभार मानले.
- स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- मोठा गट ( अकरावी ते बारावी) मुले रोहन सतीश सुर्वे, षीकेश विठ्ठल पवार, निखिल गणेश यादव (मुली) भारती सुनील कदम, पल्लवी सुधाकर पवार, श्रद्धा गोरख पवार.
मध्यम गट (आठवी ते दहावी) मुले- अभिषेक बाळू पांढरे, आकाश राजेंद्र मदने, यश रवींद्र पवार.
मुली- पायल दत्तात्रय पवार, श्रुतिका गोरख पवार, प्रज्ञा नवनाथ पवार. लहान गट (पाचवी ते सातवी)
मुले- समर्थ युवराज खवले, आर्यन पोपट शेगर, अनुज अभिमन्यू पवार. मुली- आरती उत्तम खवले, गौरी दादा पवार, ऋतुजा तानाजी पवार.