‘काकडेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मला खाली उतरण्याची गरज नाही’

पंकजा मुंडेंचा संजय काकडेंनी टोला 

पुणे: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडेंनी ‘पंकजा मुंडेंना स्वतःचा मतदारसंघ सांभाळता आला नाही त्या राज्यात काय दिवे लावणार’ अशा शब्दात टीका केली होती. या टीकेवर आता मुंडेंनी काकडेंना टोला लगावला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडे याना काकडेंच्या विधानाबाबत विचारले असता, संजय काकडेंच्या विधानावर उत्तर देण्यासाठी मला खाली उतरायची गरज नाही. स्थानिक पातळी वरील आमदार माधुरी मिसळ यांनी त्यांना उत्तर दिले आहे. अशा शब्दात पंकजांनी काकडेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या की, माझा प्रभाव का झाला? मला मतदार संघ सांभाळता आला नाही का ? हे प्रश्न भाजप नेत्यांनी विचारला असता तर ठीक होत. परंतु भाजपातील कुणीही मला याबद्दल काही विचारलेलं नाही. मग काकडे म्हणजे नवीन भाजप आहे का ? असा प्रश्न हि मुंडेंनी यावेळी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.