राहुरी – नगर येथील एका तरुणाने राहुरी येथील एका कॉलेज तरुणीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना टाकळीमियॉ येथे घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात नगर येथील समीर शब्बीर शेख (रा. पाईपलाईन रोड, सावेडी) या तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील तरूणी टाकळीमियॉ येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दि. 17 जुलैला ती तरुणी कॉलेजमध्ये गेली होती. ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी परत आली नाही.
तिच्या नातेवाईकांनी कॉलेज व परिसरात शोध घेतला. त्या तरुणीला समीर शब्बीर शेख याने अपहरण करून पळवून नेल्याचा तिच्या नातेवाईकांना संशय आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.