दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या भारतात आलेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने बंगलोरच्या चेन्नास्वामी क्रिकेट मैदानालाही भेट दिली होती. त्यावेळी त्याने सांगितले की तो आगामी आयपीएल (IPL 2023) साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाच्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आला आहे. डिव्हिलियर्स सध्या मुंबई शहरात असून तेथील गोष्टींचा अनुभव घेत आहे. यावेळी त्याचा मुंबईच्या गल्लींमध्ये चाहत्यांसोबत क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
“रोहितच्या खराब खेळण्याने इतर खेळाडूंवर दबाव”,सुनील गावस्कर यांचं वक्तव्य!
एबी डिव्हिलियर्सने गेल्या वर्षीच्या आयपीएलनंतर सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेत तो कोणत्याही संघाकडून खेळताना दिसणार नाही. मुंबईत पोहोचल्यावर डिव्हिलियर्सने पहिली ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या भेटीबाबतची माहिती डिव्हिलियर्सने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून दिली आहे.
सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यात एक खास भेट झाली. त्याबाबत डिव्हिलियर्सने म्हटले की, ‘आज मला सचिन तेंडुलकरसोबत काही वेळ चर्चा करायला संधी मिळाली. मला वाटलं होतं की त्यांची मुलाखत घेईल, पण त्याचं बोलणं ऐकून आणि त्याच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे मुलाखतीला विषयच राहिला नाही. मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद “मास्टर ब्लास्टर”.
GOAT 🐐 in Mumbai #Abdevillers @ABdeVilliers17 pic.twitter.com/HtoG9u1VUu
— Prashant _17𓃵 (@ineffable_1817) November 7, 2022
एबी डिव्हिलियर्सचे जगभरात चाहते असून तो असा एकमेव खेळाडू आहे, ज्याबद्दल कोणालाही राग किंवा द्वेष वाटत नाही. त्याने अनेक वर्ष आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी क्रिकेट खेळले आहे. त्याच्या फलंदाजी शैलीमुळे त्याला मिस्टर ३६० म्हणतात. कारण तो फलंदाजी करताना मैदानाच्या प्रत्येक बाजूला सहज फटका खेळू शकतो. भारताच्या सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची तुलना आता डिव्हिलियर्सच्या फलंदाजीशी केली जात आहे.