पुणे – राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त आनंदाचे वातावरण आहे. मात्र हिंजवडीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. हिंजवडी परिसरात मेडिकल दुकानात एक तरुण गोळ्या आणण्यासाठी गेला असताना त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केला असता मृत घोषित करण्यात आले. मात्र डिजे समोर नाचत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हंटले जात आहे. मात्र घटनेची सत्यता समोर आली आहे.
तरुण योगेश साखरे याला जवळपास सहा महिन्यांपासून बीपीचा त्रास होत होता. त्यानंतर तो हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदान करण्यासाठी गेला होता. हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदानासाठी गेला असता त्या ठिकाणी त्यास डॉक्टरांनी सांगितले की तुला हृदयाचा त्रास आहे यावरून डॉक्टरांनी पेशंट याला सांगितले होते की तू गौतम जुगल या डॉक्टरांच्या सिनर्जी हॉस्पिटल कोकणी चौक येथे दाखवून घे उपचार कर आज रोजी सदर मुलगा हिंजवडी चौक येथे असताना त्याला छातीत दुखत असल्याने तो समर्थ मेडिकल हिंजवडी चौक येथे गोळ्या घेण्यासाठी आला होता.
योगेश हा कुठल्याही डीजे समोर नाचत नव्हता असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत तसेच तो ज्या मेडिकल समोर उभा होता त्या ठिकाणी जवळपास कुठलाही डीजे वाजत नव्हता. मेडिकल जवळ असताना त्याने तेथे आलेले त्याच्या मित्रांना सांगितले की त्याला चक्कर येत आहे. त्यानंतर तो लगेच चक्कर येऊन जमिनीवर पडला मित्राने तेथेच जवळ असलेले रणजीत हॉस्पिटल येथे त्याला तात्काळ नेले असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही रुबी हॉस्पिटल हिंजवडी येथे तात्काळ घेऊन जा, सदर ठिकाणी पेशंटला घेऊन पोहचले असता तेथील डॉक्टरांनी दरील मुलगा मयत झालेला आहे त्यानंतर पोस्टमार्टसाठी बॉडी औंध हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली आहे.