वाल्हे: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे (ता.पुरंदर ) नजिक कामठवाडी येथे छोटा हत्ती टेम्पो व आयशर टेम्पो यांच्या मध्ये भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता भीषण होती. अपघातानंतर जखमींना गाडीची समोरील काच फोडून बाहेर काढण्यात आले. व प्राथमिक उपचारासाठी वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. व पुढील उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रूग्णालयात तातडीने दाखल केले अशी माहिती, वाल्हे पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
अपघातामधील जखमींना, पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ.दिगंबर दुर्गाडे, अक्षय दुर्गाडे, संभाजी पवार, धनंजय दुर्गाडे, संतोष गायकवाड, शांताराम दुर्गाडे, मंगेश दुर्गाडे आदींनी गाडीतून बाहेर काढून पुढील उपचारासाठी वाल्हे येथे पाठवण्यात आले.
या अपघातामध्ये छोटा हत्ती टेम्पो (क्रं एम एच १२ के पी ३७१६) व आयशर९०९ टेम्पो (क्रं एम एच ११ सी एच ५४२८) यांच्या मध्ये भीषण अपघात झाला. या अपघामध्ये, छोटा हत्ती टेम्पो चालक प्रदिप श्रीरसागर व किशोर दुर्गाडे (रा.वाल्हे कामठवाडी) यांना डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातात नंतर आयशर ९०९ टेम्पो चालक टेम्पो अपघात ठिकाणी सोडून फरार झाला आहे.
अपघाताची फिर्याद तानाजी भुजबळ यांनी वाल्हे पोलिस ठाण्यात दिली असून, हा अपघात आयशर ९०९ टेम्पो च्या चालकाच्या हयगयीने, अविचाराने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून,भरधाव वेगाने जेजुरी – निरा रोडणे, जेजुरी बाजूकडून निरा या दिशेने जात असताना, निरा दिशेकडून जेजुरी साईडला चाललेल्या छोटा हत्ती टेम्पोला जोरदार धडक दिली.
यामधील चालक व सहप्रवाशी यांना गंभीर दुखापत झाली. तसेच दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तानाजी भुजबळ यांनी आयशर ९०९ टेम्पो चालक नवनाथ मदने (रा. कुमठे ,ता. कोरेगाव, जि.सातारा) यांच्या विरुद्ध वाल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलिस हवालदार हनुमंत गार्डी, बी. व्ही. जगदाळे, समीर हिरगुडे आदी करितआहेत.