अइझोल – विधानसभा निवडणुकीत यंदा मिझोरममध्ये एकूण 174 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मात्र, मागील वेळेपेक्षा (वर्ष 2018) ती संख्या 35 ने घटली आहे. मागील निवडणुकीत एकूण 209 उमेदवार रिंगणात होते.
मिझोरममध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी समाप्त झाली. त्यामुळे निवडणूक रिंगणात कायम राहिलेल्या उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली. उमेदवारांपैकी 27 जण अपक्ष आहेत. तर, उर्वरित 5 राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात.
सत्तारूढ मिझोरममध्ये एकूण 8 लाख 56 हजार 868 मतदार आहेत. मिझोरम निवडणुकीचा निकाल इतर 4 राज्यांसमवेत 3 डिसेंबरला जाहीर होईल. सत्तारूढ मिझो नॅशनल फ्रंट, प्रमुख विरोधी पक्ष झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि कॉंग्रेसने प्रत्येकी 40 उमेदवार दिले आहेत. भाजप 23 जागा लढवत आहे. तर, प्रथमच मिझोरमची निवडणूक लढवत असलेल्या आपने 4 उमेदवार दिले आहेत.