करोना विषाणूने संपूर्ण जग प्रभावीत झाले असून त्याला रोखण्यसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.याच काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पुढाकार घेत गरजुंना मदतीचा हात दिला आहे. तसेच करोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठीही अनेक उपक्रम राबविले जात आहे. यात कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. अनेकांनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे गरजुंना मदत केली आहे. यामध्ये आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मदतीसाठी पुढे सरसावली आहे.
Bid for Good!
I have teamed up with @FankindOfficial to auction my art & help raise funds to provide ration kits to daily wage workers. There is something for everyone – digital prints, sketches & large canvas paintings. The highest bidder wins! https://t.co/MrgsFnSvaZ pic.twitter.com/MquGf8zKPg— Sonakshi Sinha (@sonakshisinha) May 15, 2020
सोनाक्षीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे, सोनाक्षीने तिच्या कलेच्या माध्यमातून गरजुंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी तिच्या आर्टवर्कचा लिलाव करणार आहे. यात तिने रेखाटलेले चित्र, डिजिटल प्रिंट्स याचा लिलाव करणार असून त्यातून जमा होणारी रक्कम ती गरजुंच्या मदतीसाठी वापरणार आहे.