नेवासा, (प्रतिनिधी) – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकटआरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा नववा दिवस असल्यामुळे सोमवारी (दि.१९) छत्रपती शिवरायांची जयंतीचे औचित्य साधून बेलपिंपळगाव, टाकळीभान येथील सकल मराठा समाजाच्या युवकांनी अंतरवली सराटी येथे जाण्यासाठी ५३ वाहनांची रॅली रवाना झाली.
या वाहनांचा ताफा नेवासा शहरात दाखल होताच आमदार शंकरराव गडाख मिञ मंडळाच्यावतीने नेवासा बसस्थानकासमोर सत्कार करण्यात आला.यामध्ये आमदार गडाख पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव, पोपटराव जिरे, लक्ष्मण नाबदे, नारायण कोरेकर, संतोष पंढुरे यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.