नेवासा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील भेंडा येथे आद्य क्रांतीगरु लहुजी वस्ताद साळवे यांची १४३ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भेंडा गावचे सरपंच नामदेव निकम व सौंदाळा गावचे सुधीर आरगडे, किशोर मिसाळ, भारतीय लहुजी सेनेचे राज्य प्रमुख सुरेश आढागळे यांच्याहस्ते वीर लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नारायण पाटील आरगडे, शिवाजी आरगडे, विलास आरगडे, संजय आढागळे, वीर लहुजी वस्ताद यांचे जीवनकार्य आपल्या भाषणातून विषद केले. यावेळी मिनीनाथ आरगडे, बाळासाहेब आरगडे,आयोजक सुरेशराव आढागळे, सत्यवान खंडागळे, येडूभाऊ सोनवणे, अनिल ससाणे, भाऊराव नेटके, राहुल आढागळे, भारत खंडागळे, बाळासाहेब बोधक, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आरगडे, लक्ष्मण आरगडे, जनाभाऊ चामुटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गोर्डे यांनी केले.