बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याचा 2018मध्ये प्रदर्शित झालेला “सिंबा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. हा चित्रपट आता ऍनिमेटेड व्हर्जनमध्ये येणार आहे. याबाबत खुद्द चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांनी पुष्टी दिली आहे. रोहित शेट्टी स्पिन-ऑफ शो “स्मॅशिंग सिंबा’चा टीझर इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
हा शो यंदा दिवाळीनिमित्त एका किड्स चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंटने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर लिहिले की, “स्मॅशिंग सिंबा गर्जना करत आहे. माइंड इज ब्लोइंग! या तेज-तर्रार पोलीस अधिकारी बनू इच्छिणाऱ्या किशोरच्या कारनाम्यांमध्ये सहभागी व्हा.
दरम्यान, “सिंबा’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह बतौर एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकला होता. यात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खानने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.