वॉशिंग्टन – संपूर्ण जगाला करोनाने ग्रासले असताना स्थिती पूर्वपदावर केव्हा येईल याबाबत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आपले विचार मांडले आहेत. करोन लसीची दुसरी पीढी बाजारात येईल तेव्हाच सगळ्या समस्यांवर तोडगा निघू शकतो असे त्यांनी नमूद केले आहे.
जेव्हा लसीचा पहिला डोस अर्थात पहिली पीढी आपल्याकडे असेल व त्यानंतर अत्यंत प्रभावशाली लस तयार झाली असेल व ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तेव्हाच स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात होईल. करोनामुळे निर्माण झालेल्या सगळ्या समस्यांना तेव्हा पूर्णविराम मिळेल.
जगभरातल्या अनेक कंपन्या लस तयार करत असून प्रत्येकाची प्रक्रिया वेगवेगळी आहे, हीच आता आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे लवकरच चांगली लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, 2021 पर्यंत श्रीमंत देशांतील स्थिती सामान्य झाली असेल असे गेट्स यांनी 6 ऑक्टोबर रोजी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.