खेड तालुक्यात करोनाबाधितांचा उच्चांक
राजगुरूनगर (पुणे)-खेड तालुक्यात मागील 24 तासात पुन्हा नव्याने 207 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले. तालुक्यात 24 तासात पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींचा हा उच्चांकी संख्या आहे. तालुक्यात बाधित व्यक्तींच्या संख्या 5409 वर पोहचली आहे.
मागील 24 तासात राजगुरूनगर 21, चाकण 52, आळंदी 30 या तीन नगरपरिषदांमिळून 103 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तर ग्रामीण भागातील चांडोली 2, दोंदे 2, गारगोटवाडी 3, वडगाव पाटोळे 1, आंबेठाण 5, गडद 1, कडाचीवाडी 3, खराबवाडी 5, कुरुळी 3, म्हाळुंगे 4, मेदनकरवाडी 14, नाणेकरवाडी 5, शेलू 1, शिंदे 1 शिवे 1, येलवडी 1, पाईट 1, ढोरे भांबुरवाडी 2, तुकाई भांबुरवाडी 2, होलेवाडी 1, राक्षेवाडी 6, सातकरस्थळ 1, शिरोली 1, वाकी बुद्रुक 1, बहुळ 2, भोसे 3, चऱ्होली खुर्द 1, चिंचोशी 1, धानोरे 1 काळूस 2, मरकळ 5, रासे 2, साबळेवाडी 1, शेलगाव 7, शेलपिंपळगाव 1, वडगाव घेनंद 5, दावडी 1, खरपुडी बुद्रुक 1, गुळाणी 1 या 41 गावात एकूण 104 जण नव्याने पॉझिटिव्ह सापडले आहेत.