नागपूर- नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून आज ते मुंबईसाठी रवाना झाले. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. काही दिवस विश्रांती घेवून पुढचा पदभार स्विकारण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले.
आतापर्यंत कोणत्याच आयुक्तांना जसा निरोप दिला नाही तसा निरोप नागपूरकरांनी तुकाराम मुंढेंना दिला. गेले 7 महिने ते नागपूरचे आयुक्त होते. अनेक रखडलेली कामे त्यांनी पुर्णत्वास नेली. त्यामुळे नागपूरकरांनी त्यांच्या कामाला, त्यांच्या धैर्याला पसं दिली. त्यांना निरोप देण्यासाठी आज त्याचे हजारो समर्थक त्यांंच्या निवासस्थानाबाहेर जमले. त्यांच्या फुलांचा वर्षाव केला.
दरम्यान, तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून यावेळी ‘We Want Munde Sir’ तसंच ‘आगे आगे मुंडे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा दिल्या. तर काहींनी त्यांच्या कारपुढे झोपून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.
तुकाराम मुंढेंच्या कामाल नागपूरकारांंची पसंतीच नव्हती तर त्यांच्यावर विश्वास सुद्धा होता. हे या निरोपातून दिसून आलं. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते.