- आरोग्य विभागाची कारवाई ः वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे पडले महागात
चऱ्होली – भोसरी परिसरातील चांदणी चौकातील सार्वजनिक कचराकुंडीत वैद्यकीय कचरा टाकणे भोसरीतील दोन खाजगी दवाखान्यांना चांगलेच महागात पडले आहे. ई क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात साई जीवन हॉस्पिटल भोसरी यांना 25000 व विवेकानंद हॉस्पिटल भोसरी यांना 25000 रुपये दंड ठोठावला आहे. सदर कारवाई आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या सूचनेनुसार ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्य अधिकारी राजेश भाट व मुख्य आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमारे, आरोग्य निरीक्षक शंकर घाटे यांच्या पथकामार्फत करण्यात आली.