शिक्रापूर -करंदीफाटा ते तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याच्या साइडपट्ट्या व डांबरी रस्ता एका कंपनीकडून केबल गाडण्यासाठी खोदल्याप्रकरणी माहिती सेवा समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात खोदकाम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
श्रीनिवास इंटरप्राईजेस भोसरी कंपनीचे ठेकेदार राजू राठोड (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता भगवानदास रघुनाथ कुसाळे यांनी फिर्याद दिली आहे.