एक दरवाजा उघडून 825 क्यूसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग
निमोणे- कुकडी प्रकल्पातून 1500 क्यूसेक वेगाने पाणी घोडनदीत सोडण्यात येत असल्याने चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण 87.88 टक्के भरले आहे.
धरणात 4282 दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाल्याने धरणाचा एक दरवाजा उघडून 825 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना दिली.
सध्या कुकडी प्रकल्पातील अनुक्रमे येडगाव 95.50 टक्के, माणिकडोह 37.67 टक्के, वडज 90.64 टक्के, पिंपळगाव जोगे 29.26 टक्के तसेच डिंभे 93.09 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याने घोड धरणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. घोड धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.