बिजींग – करोना लसीच्या संबंधात अजून जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्याही लसीला अधिकृत मान्यता दिलेली नसली तरी चीनमध्ये मात्र गेल्या जुलै महिन्यापासूनच करोनाच्या संबंधातील लसीचा सर्रास वापर सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
जुलैपासून चीनने हाय रिस्क गटांना या लसी टोचण्याचे काम हाती घेतले आहे. तथापि चीनने हे काम प्रायोगिक तत्वावर केले जात असल्याचे नमूद केले आहे.
तथापि मोठ्या प्रमाणावर या लसीचा वापर केला जात असल्याने ही लस वापरण्यासाठी विश्वसनीय आहे असे वातावरण निर्माण करण्यासाठीच हाय रिस्क गटांना मोठ्या प्रमाणात या लसीचे डोस दिले जात असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
आणिबाणीची स्थिती म्हणून ही लस वापरण्यास चीन सरकारने 24 जून रोजीच अनुमती दिली होती असे या सूत्रांनी नमूद केले. सध्या तेथील या लसीची किंमत सरकारने नियंत्रित केली आहे.