राजगुरूनगर – खेड तालुक्यात 24 तासांत नव्याने 81 जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्याची बाधितांची संख्या 2431 तर मृतांचा अकडा 63 वर पोहोचला आहे. 1987 जणांनी करोनावर मात केली असून आता 387 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
24 तासांत राजगुरूनगर (12), चाकण (10),आळंदी (10) या तीन नगरपरिषदांमिळून 32 तर ग्रामीण भागातील चऱ्होली (2), वडगाव घेनंद (3), किवळे (6), कनेरसर (1), वाकी बुद्रुक (4), संतोषनगर (1), चास (1), नाणेकरवाडी(5), रासे (5), मरकळ (1), रेटवडी (2), दावडी (3), सातकर स्थळ (1), बहिरवाडी(1), कान्हेवाडी(1), आंबेठाण (1), खालुंब्रे ( 1), म्हाळुंगे (6), मेदनकरवाडी (2), शेलपिंपळगाव (1), कडाचीवाडी (1) या 21 गावांत 49 अशा एकूण 81 जणांना लागण झाली आहे.