रेडा -माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा 57 वा वाढदिवस इंदापूर तालुक्यामध्ये विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवार (दि.21) वाढदिवसानिमित्त गावागावांमध्ये वृक्षारोपण व रोपांचे वाटप, विविध स्पर्धा, केकचे वाटप आदी उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्यात आला.बावडा गावातील रत्नप्रभादेवीनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आंब्याच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नागरिकांना रोपांचेही वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, महादेव घाडगे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, पवनराजे घोगरे, शिवाजीराव पवार, सचिन सावंत, दिलीप नायकुडे, नवनाथ पवार उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई या निवासस्थानी ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त केक कापून आपल्या साहेबांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. पाटील हे करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची गर्दी होऊन करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मतदारसंघांमध्ये नव्हते. येथील नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर वाढदिवसानिमित्त प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.