कोरेगाव भीमा -मांजरी खुर्द गावच्या विकासासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्रित प्रयत्न करत आहोत. लवकरच मांजरी गाव हे विकासाचे मॉडेल म्हणून सर्वांना दिसेल, असा विश्वास माजी सभापती रोहिदास उंद्रे यांनी व्यक्त केला.
मांजरी खुर्द ग्रामपंचायत निधीतून माणकाई नगर येथील अंतर्गत रस्ते व हायमास्ट दिवे अशा एकूण 25 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उंद्रे बोलत होते.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी सभापती रोहिदास उंद्रे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, जिल्हा सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, हवेली तालुका उपाध्यक्ष गणेश कुटे, शरद आव्हाळे, नगरसेवक योगेश मुळीक, वडगावशेरी भाजपचे अध्यक्ष संतोष खांदवे, सरपंच मनीषा उंद्रे, उपसरपंच बेबीताई उंद्रे, सदस्य विकास उंद्रे, हिरामण गवळी, वर्षा मोरे, स्वप्निल उंद्रे, धनश्री उंद्रे, भाऊ साळुंखे, महेश पवार, माउली उंद्रे, माजी सरपंच विलास उंद्रे, राम चौधरी, गौरव आव्हाळे, संदीप आव्हाळे, मोहन शिंदे, हिमांशू दुबे, विनीत सिंग, राणावत, दिनेश रेगुडे, संजय लावंड, सचिन मोरे, दादा सोनवणे, लहू चेंडगे, कविता भराटे, कविता चेंडगे, सुभाष आव्हाळे उपस्थित होते.
मतदारसंघाच्या विकासाबरोबरच मांजरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. विकासाबरोबरच आदर्शग्राम कसे निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– गिरीश बापट, खासदार, पुणे शहर