राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासात 49 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात बाधित व्यक्तींची संख्या 2179 तर मृत्यूची संख्या 55 झाली आहे. आतापर्यंत 2179 बाधित व्यक्तींपैकी 1812 जण बरे झाले आहेत. तर 312 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली आहे.
जुन्नरमध्ये 17 बाधित
जुन्नर -तालुक्यात मंगळवारी (दि. 18) 17 करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकूण बधितांचा आकडा 623 झाला आहे. यापैकी 475 जणांनी करोनावर मात केली आहे. 120 जण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा 28 झाला आहे.
शिरूरमध्ये 38 रूग्ण
शिरूर -शिरूर तालुक्यातील 17 गावात 38 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर रांजणगाव गणपती येथील 83 वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे दिली. तालुक्यात एकूण बाधितांचा आकडा 925 झाला आहे.
शिक्रापुरला 19ची भर
शिक्रापूर -परिसरात 19 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.
उरुळीत 24 पॉझिटिव्ह
सोरतापवाडी -उरुळी कांचन येथे एकाच दिवसात 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
भोरमध्ये आढळले सहाजण
भोर -तालुक्यात करोनाबाधितांची 6रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 431 झाली आहे.